About Website

About Website

आज आधुनिक समाजासाठी अत्यंत आवश्यक लघु-उदयोग, गृहोपयोगी उदयोग, आधूनिक उदयोग, सेवा उदयोग, अन्न प्रक्रिया उदयोग, शेतीवाडी संबंधित उदयोग, असे अनेक उदयोग किंवा व्यवसाय जेवढे जास्तीत-जास्त शक्य आहे. त्याची सविस्तर माहिती देण्याचा प्रयत्न या वेबसाईट मध्ये केला आहे. आज जग बदलत चालले आहे. आधूनिकतेने गावा-गावात प्रवेश केला आहे. कॅप्युटर प्रणाली सारखे तंत्रज्ञान आज भारतामध्ये चांगल्या प्रतिने उपलब्ध आहे. आज शिक्षणाचा प्रसार–प्रचार होत असल्याने देशातील जस्तीत-जास्त जनसंख्या साक्षर झाली आहे. नोकरीला मात्र एक सामाजिक दर्जा (प्रतिष्ठा) असल्याच्याकारणाने शिकलेला व सुशिक्षित युवा वर्ग नोकरीच्या मागे लागला आहे. तसे बघायला गेल तर आपली शिक्षण पद्धती काही प्रमाणात नोकरी भिमूख झाली आहे. कोणतीही नोकरी करावयाची आहे, हे ठरवून विशिष्ट कोर्ससाठी प्रवेश घेतला जातो. परिणामत: एक विशिष्ट कोर्सची प्राप्ती करुन मोठया प्रमाणात बेरोजगारी निर्माण झाली.

विद्यार्थी मिळालेल्या ज्ञानाचा उपयोग करुन स्वत:चा एखादा उदयोग व व्यवसाय करू शकतात. स्वत: रोजगाराबरोबर समाजाला ही नोकरी व रोजगार निर्माण करुन देऊ शकतात. आजच्या युवकांना हे लक्षात असूनसुध्दा उदयोगाकडे व व्यवसायाकडे जाण्याचे प्रमाण कमी झाले आहे. याचं कारण समाजानेनोकरीला फार मोठं प्रधान्य दिले आहे. पण प्रत्येकांना नोकरी मिळण शक्य नाही, कारण नोकरीसाठी इच्छुक उमेदवाराची अपेक्षा रोजगाराची नवनिर्मिती कमी करत आहे. या कारणामूळे बरेच लोक नोकरीच करणार या उददेशाने बेरोजगार राहू लागले आहेत. आज हजारो लोक बेरोजगार दयनिय जीवन जगत आहेत. ही आजच्या समाजाची वास्तविक्ता आहे.

आशा युवकांना स्ववलंबी बनवण्यासाठी काही संस्था,व्यक्ती,पुस्तके आदर्श काम करत आहेत. पण सगळ्यांनायाचं प्रत्यक्ष मार्गदर्शन मिळल अस नाही. या करणासाठी या वेब साईटच्यारूपाने तुम्हाला मार्गदर्शन मिळेल. उदयोगाची व व्यवसायांची त्याच्या मनात रुची निर्माण होऊन ते स्वत:बरोबर समाजासाठी ही रोजगारी निर्माण करेल यासाठी जेवढे शक्य आहे. तेवढया व्यवसाया ची माहिती देण्याचा प्रयन्त या वेबसाईटमध्ये केला आहे.

काही वर्षापूर्वी आपल्या देशामध्ये १२ बलुतेदार पद्धत होती. आणि काही प्रमाणात ती आजूनही आहे. पण ठराविक एखादा व्यवसाय ठराविक एखादया समाजाने केलाच पाहिजे, असे बंधन आज राहिलेले नाही. उदयोग व्यवसायाच्या जगात आज सगळ्यांना समान संधी आहे. आधूनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने खूप फायदा देणारे व्यवसाय आपण पाहतच आहोत. “ इच्छा तिथे मार्ग “ अस म्ह्टलं जात. जर आपल्याला पारंपारिक उदयोगामध्ये रुची नसेल. तर आधूनिक उदयोगाकडे जायला हवे. स्वत:च्या उदरनिर्वाहासाठी रोजगार निर्माण करता – करता आपल्या बरोबर समाजातील काही गरजु लोकांना रोजगार निर्माण करुन दिला तर ते एक अप्रत्यक्ष स्वरुपातील समाज कार्य होईल.

आज बाजारात खुप कंपन्या आशा आहेत की, ज्या गरिब निष्पाप, समान्य लोकांना लवकर श्रीमंत बनवण्याचे स्वप्न दाखवतात. आणि आपल्या स्किम, प्लॉन्स समजावून पैसे लावायला सांगतात. काही दिवसात या कंपन्या बंद पडतात. आणि कुठे गायब होतात याचा पत्ताही लागत नाही. पैशे लावणारे सामान्य गरिब लोकांना आर्थिक नुकसान सहन करावे लागते. आणि कंपनीवाले स्वत: धनवान होतात. ही गोष्ट लक्षात ठेवा की, जगातील कोणतीही कंपनी आपल्याला श्रीमंत करण्याची नसते.स्वत:च्या फायदयासाठीकंपन्याची निर्मिती केली जाते. मित्रानो या जगात मेहनती शिवाय काही मिळत नाही.मग ती मेहनत बौदधीक असो वा शारिरीक प्रयन्त करत रहावा. तुम्ही यशाच्या शिखरावरती नक्कीच पोहचाल जगातील अत्यंत श्रीमंत व्यक्तीचा इतिहास पलटून पहा. तुमच्या लक्षात येईल की हे सर्व लोक उदयोग-व्यवसायाच्या माध्यमातून यशाच्या शिखरावर पोहोचले आहेत. आपणही आशा कोणत्या उदयोग. व्यवसायाचा गहण अभ्यास करुन कंष्टाची तयारी ठेवून उदयोग प्रणव राहिलोत, तर यशस्वी होवू.

उदयोगधंदयाची नवनिर्मिती करता वेळी स्वतःच्या प्रगतीबरोबर समाजाच्या प्रगतीसाठी अर्थात अप्रत्यक्षरी त्या देशाच्या प्रगतीसाठी मदत होईल अशी भावना ठेवण अत्यंत गरजेच आहे. जगातील कुठल्याही व्यक्तीची आजची आणि भविष्यातील परिस्थिती एकसारखी राहत नाही. परिस्थितीवर स्वार होवून आपलं धेय प्राप्त करण्याची जिद्द ठेवलीत. तर यशाच्या मागे तुम्हाला धावण्याची गरज पडणार नाही, कारण यश स्वतः तुमच्या जवळ येईल. जगातील सर्वात श्रीमंत लोकांनी कठोर मेहनत बुद्धी चातुर्य आणि उदयोगनितिने उदयोग-व्यवसाय स्थापन करुन धनसंपत्ती कमवली असा इतिहास आहे. जर आपलपण अस मोठ स्वप्न असेल तर ही वेबसाईट आपल्याला निश्चित एक दिशा वमार्ग देईल अशी आम्हाला आशा आहे.

नव उदयोजकांना नवा उदयोग-व्यवसाय सूरू करते. वेळी येणाऱ्या सर्व अडचणीचे समाधान या वेबसाईट मधून देण्याचा केवील वाना प्रयत्न आहे. राज्यसरकार, तसेच केंद्र सरकार उदयोगांनसाठी ज्या सहाय्यक योजना आणतात. याची सविस्तर माहिती यामध्ये देण्यात आली आहे. आजकाल सर्व ठिकाणी बचतगट, महिला मंडळ यांची स्थापना झाली आहे. स्त्रियांना घर- गृहस्थी सांभाळत करण्या योग्य खूपशे लघू तथा उदयोग-व्यवसायाची माहिती या वेबसाईटमध्ये देण्याचा प्रयत्न आम्ही केला आहे.