महिला उद्योग

Women Entrepreneurship

Women entrepreneurship has been recognized as an important source of economic growth.

At Nalavade Infotech, we believe that women are also blessed with qualities that will make them good businesspersons. Women entrepreneurs create new opportunities for themselves and others as well.

That is why we bring an assortment of Machines and Equipment that will help women to establish micro enterprises and be self reliant and successful.

शेवई मशिन : ग्रामिण व शहरी महिलाना स्वयरोजगारासाठी ताशी १० ते ८० किलो उतपादन. वेगवेगळ्याप्रकारच्या नाविन्यपूर्ण, रंगीत फळाचा ज्युस, दुध, तूप वापर करुन सुगंधी स्वादिष्ट, चविष्ट उत्पादन. लग्न, मुंजी, वाढदिवस, रेग्युलर स्विट डिश म्हणून वापर.शेव, चकली, पट्टी पापड, मॅगी इत्यादी उत्पादन करता येते.

पापड मशिन : कुर्रम-कर्रम विविध प्रकारचे पापड महिलाना वरदानच ! मशीन आकर्षक असून वापरणयास अंत्यत साधे सोपे, घरगुती वीजेवरती चालते. उडीद, मुग, तांदुळ, बाजरी, गहु, अशा विविध धान्याचे पापड. ओली मिरची, लाल मिरची, मिरा, लसुन, तिखट, मीठ, इत्यादी वापरून बनवितात. पुरी, रोटी भाकरी, चपाती बणविण्यास उपयुक्त.

वेफर्स मशिन : चविष्ट फास्ट फूड,बटाटा, केळी, गाजर, मुळा, रताळी, इ. पासून वेफर्स, चिवडा. विविध प्रकारे ताशी ८० किलो वापरता येतो. १ हॉर्र पॉवर, सिंगल फेज मोटरवरती थ्री – इन-वन मशिन साल काढणे (पिलीग), चिप्स बनविणे (स्लायसिंग),कोरडे करणे (ड्रायर),तयार चिप्स तेलामध्ये तळून आकर्षकपॅकिंग करुन बाजारात चांगल्या दराने विकल्या जातात. वेफर्सला मागणी उत्तमच असून दरही चांगला मिळतो.

फरसाण मशिन : लहानापासून मोठयानपर्यंत, गरिबापासून श्रीमंतांपर्यंत सर्वानाच आवडणारा फरसाणा, आकर्षक, सुटसुटीत स्वतंत्र उदयागो ! गृहिणीना वरदानच ! सुटसुटीत, वापरणेस अत्यंत साधे-सोपे, सिंगल फेज वीज कनेक्शनवरती वापरता येते. उत्पादन २ किलो / मिनिट बनविता येते. विविध प्रकारची शेव, पापड, गाठी शेव इ. तिखट, गोड बनविता येते. उत्पादन चांगल्या तेलामध्ये तळल्यानंतर आकर्षक पॅकिंग करुन बाजारात विकले जाते. बाजारपेठ मोठी असल्याने सहज उत्पादन विकले जाते.

ऑटो पापड मशिन : कुर्रम कर्रम खुसखुशीत विविध प्रकारचे पापड बनवण्यासाठी अत्याधुनिक पद्धतीने जलद होण्यासाठी स्पेशल मशिन ! सर्व प्रकारच्या पापडासाठी पीठ, पाणी व मसाला एकत्र करुन पीठ मळते व मशिनमधून सरळ एकसारख्या जाडीची लादी बनते. बनवलेली लादी दोन रोलरच्या सहाय्याने हव्या त्या जाडीचा पापड लेअर मशिन रोलरवरील डायने कटींन करुन विविध गोलाचे पापड तयार होतात. व विविध प्रकारचे ताशी ५/१०/२० किलो पापड बनतात.

ऑटो वेफर्स मशिन : आजच्या धावत्या दुनयेत कमी वेळेत अधिक स्वादिष्ट, रुचकर व चविष्ट उत्पादनासाठी फास्ट फूडची गरज असलेले बटाटा, केळी, गाजर, मुळा, राताळी, बीट, इ. चिप्स बनविल्या जातात. १ हॉर्सपॉवर सिंगल फेजइलेक्ट्रीक मोटार असून ताशी २००/२५० किलो उत्पादन वेगवेगळ्या नमुन्याचे चिप्स, जिगजॅग वेफर्स बनविली जाते. तेलामध्ये तळेन आकर्षक पॅकिंग करुन विकल्या जातात.

पॉपकॉर्न मशिन : लहानांपासून वृद्धांपर्यत चविष्ट, स्वादिष्ट, व रुचकर, चटकदार पॉपकॉर्न बनविण्याचे साधे सोपे मशिन ! अर्धा किलो मक्का, बाजरी, राजगिरा (कवळी ज्वारी) इ. पासूनपॉपकॉर्न बनवितात. हिटींगसाठी इलेक्ट्रीककॉईन (शेगडी) असून स्विचमुळे चालू-बंद करणेची सोय. मशिन घरगुती सिंगल फेज असल्याने मागणी भरपूरच ! छोटया भांडवलदारास वरदानच !चविष्ट, टेस्टी मसाला वापरल्याने तयार लाह्या, प्लॅस्टीक पॅकिंग करुन बाजारात, बस स्टॅड, बेकरी,सिनेमागृहे, नाटयगृहे,बाग, क्रिडांगण,सभागृह, शाळा इ. ठिकाणी चांगली विक्री असून कमीत कमी भांडवलामध्ये अधिक नफा देणारा व्यवसाय ! (मशिन इलेक्ट्रीक व गॅसमॉडेलमध्ये उपलब्ध.)

मिरची कांडप मशिन : मिरची कांडप मशिन :प्रत्येकालाचविष्ट, रुचकर, खमंग, स्वादिष्ट भोजनासाठीतिखट हवेच ! मिरची पूड, हळद पूड,औषधाची पूड, जडी-बुटी व इतर मसाले बनविण्यासाठी वरदानच !मशिन हेवी डयुटी, आकर्षक मॉडेल व अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे कमीत कमी वेळेत अधिक उत्पादन. आवश्यकतेनुसार फिरते उखळ २,३,४ पहारी (दोन इंची ) आकारामध्ये उपलब्ध असून मशिन सिंगल फेज /थ्री फेज वरती वापरता येते. उत्पादन सरासरी ४ किलोपासुन १५ किलोपर्यंत. मिरची पूड, हळदपूड, सुपारी, वनस्पती औषधे इ. बारीक करता येते. ग्रामीण व शहरी भागात चालणारा फायदेशीर एकमेव व्यवसाय ! तसेच पीठ (कणीक) तिंबणे, मेतकूट करणे इ. कामे करता येतात.

बुंदी / राजगीरा लाडू मशिन : बुंदी / राजगीरा लाडू मशिन :चविष्ट खाणारत्याला देव देणारा ! सर्वाना आवडणारी सर्व तऱ्हेची स्वादिष्ट व रुचकर लाडू बनविणारी मशिन. बेसन शेगदाना, राजगीर, डिंक असे विविध प्रकारचे लाडू बनविता येतात.मशिनला लहान मोठया डायची सोय असल्यामुळे एकाचवेळी २,३,४ लाडू बनविता येतात. कमी मनुष्यबळ, जास्त उत्पादन,! लग्न कार्य, नामकरण समारंभ, म्रुंज, दिवाळी, दसरा, तसेच बेकरी, हॉटेल्स, उपवासासाठी इ. ठिकाणी मोठयाप्रमाणात तयार लाडू लागतात.

न्युडल्स मशिन : सध्याचा जमाना फास्ट फूडचा ! न्युडल्सना मागणी भरपूर असल्याने चविष्ट, रुचकर, स्वादिष्टन्युडल्स उत्पादनासाठी शेवंती न्युडल्समशिन अग्रसर आहे ! अधिक उत्पन्न, भरपुर आर्थिक फायदा देणारी ही मशिन हेवी डयूटी असलेले ताशी १५ ते २० किलो उत्पादन देते. मशिनला ट्रेची सोय असून दोन रोलरमुळे मॅगीची जाडी कमी अधिक करता येते.न्युडल्स कुकरमध्ये, वाफेवरती बनवितात. मसाला वापरून फेरीवाले बागबगीचा, हॉटेल्स, सिनेमागृहे इ. ठिकाणी विकतात. कमी भांडवलामध्ये भरपूर उत्पादन देणारा व्यवसाय!

पीठ मळणी मशिन : फुडप्रासेसमध्ये सर्वात कठीण काम म्हणजे पीठ मळणे. प्रत्येक पदार्थ बनविताना पीठ मळणी करावी लागते. हे मशिन महिला उदयोगाला वरदान असून पापड, फरसाणा, चपाती, पुरी, खाकरा यासाठी बाजरी, बेसन, मैदा इ. साठी पीठ मळूनच बेकरीत व घरी पदार्थ बनवितात. मशिन आकर्षक हेवी डयूटी असून ताशी २किलोपासून ८० किलोपर्यंत विविध मॉडेल्समध्ये उपलब्ध आहेत. पीठ मळणीसाठी अवश्यकतेनुसार ०.५ एच. पी.ते २एच.पी.सिंगल फेज /थ्री कनेक्शनची सोय.पाच ते दहा मिनिटात पीठ मळणी होत असल्याने खानावळ, बेकारी, पापड तयार करणे, शेवया तयार करणे इ. ठिकाणी अती आवश्यक.

flour mill

आटा चक्की : कोणताहीपदार्थ बनविताना प्रथम पीठ करुन घ्यावे लागते. त्यामुळे अंत्यत आवश्यक असणारे मशिन म्हणजे पिठाची गिरणी (आटा चक्की ) मशिन घरगुती विजेवरती असून शटर व आतील पार्टस न गंजणारे, बाहेरूनवॉटरप्रूफ सनमाईक बॉक्स, ऑटो युनिट बसविलेली ही मशिन अधिक सुरक्षित आणि कोठेही हलविता येते. मशिनवरती मिळणारे पीठ आपण वापरणाऱ्या धान्याचेच मिळेल. त्यामुळेमिक्सीग होत नाही व भरपूर पीठ मिळते मशिनमध्ये सर्व प्रकारचे धान्य, साखर, मसाले पुड, औषधे, वनस्पती यांचा उपयोग करता येतो.

पल्व्हरायजर : बहुगुणी, बहुपयोगी मशिन ! आकर्षक माडेल, हेवी मटेरियल, ग्रडेड कास्टींग पार्ट, ऑईल हायस्पीड बेरींग,दणकट स्टॅडमुळे मशिनमध्ये मोटर बसविण्याची सोय, मशिनला जाळी असलेने पीठ बरीक मोठे करता येते. घरगुती २ एच.पी. सिंगल फेज / थ्री फेज वर चालणारी, वापरण्यास साधी, सोपी, सुटसुटीत, धान्य सोडणेसाठी कमी अधिक करण्याची सोय असून आऊटलेट मोठे असल्याने पावडर जमा होणेस मदत. मिरची, ह्ळद, धने, वनस्पती औषधे, सोजी, शेवईचा रवा, साखर, शिकेकाई इ. शेकडो पदार्थाची पावडर व भरड बनते कुक्कुटपालनासाठी खाद्य, जनावरांसाठी सकस आहार, भरड बनविता येते.म्हणुन पल्व्हरायझरला शेतकऱ्यांचा मित्र म्हणतात. मशिनरी २ एच. पी. पासून १० एच.पी.पर्यत उपलब्ध.

paperdish2 hole seller

शेंगा फोडणे : कष्टकरी गरीब शेतकऱ्याचा मित्र ! मशिन साथे,सोपे हाताळण्यास योग्य. हेवी डयुटी अॅगल शीट मेटल मटेरियल,कास्टींग पार्ट पासुन बनवले आहे. हाताने वापरण्या पासून ०.५ -१-२ एच. पी. सिंगल/थ्री फेज वर चालणारी व तासी दोन पोत्यां पासुन १० पोत्यां पर्यंत शेंगा फोडण्याची सुविधा मशिन मध्ये शेंगदाणा तेल काढणे व इतर खारे शेंगदाने, तिखट शेंगदाने व उपवासाचे शेंगदाने, शेंगदाना लाडू, गुडदानी चक्की बनवीता येते.

शेवयी पीठ मळणी मशिन : कमीत कमी मनुष्यबळाचा वापर, अधीक उत्पादन, शारीरिक त्रास कमी, झटपट कामासाठी घरगुती सिंगल फेजवर चालणारी शेवई पीठ मळणी मशिन बनविली असून एकाचवेळी पाच किलो पीठ मलता येते. इलेक्ट्रीक मोटार ०.५ एच. पी. मशिनवरती शेवईची पीठ मळल्याने शेवया सुरेख, चविष्ट येतात. पीठ मळताना पाणी, दुध, तुप, वेगवेगळे रंग, डिंक इ. वापरतात. त्यामुळे शेवया मॅगी इ. पीठ मळण्यास मदत होते गुंतवणूक रू.

Diesel bhatti

डिझेल भट्टी : कोणतेही पदार्थ बनविणे सोपे. त्याची चविष्ट प्रक्रिया जलद करावी लागते.बटाटा वेफर्स, केळी वेफर्स, फरसाणा, शेव-पापडी, चकली, बुंदी, पापड इ. शेकडो पदार्थ कमीत कमी ३० ते ३५ टक्के इंधन वापरून बनविले जातात. मशिन विविध कपॉसिटिचे असुन सिंगल व डबल बर्नरची सोय. मशीन वेफर्स, फरसाण, स्वीट मार्ट, भोजनालय, मंगल कार्यालये इ. ठिकाणी उपयुक्त.

ड्रायर मशीन : फुड प्रॉडक्टस ताबडतोब तयार मिळवणेसाठी रामबाण उपाय म्हणजे ड्रायर. ड्रायरमुळे पदार्थ सुकविने व तळ्लेल्या पदार्थावर तेल कमी करणे. पदार्थ रुचकर, खुसखुशीत व चविष्ट बनविण्यास व खाद्य पदार्थ अधिक दिवस टिकविणेसठी ड्रायरचा उपयोग होतो. मशिन हेवी ड्युटी असुन स्टेनलेस स्टील ड्र्म अस्ल्याने फरसाणा, वेफर्स, चकली, शेव पापडी, शेंगदाणा इ. विविध्द पदार्थातून तेल बाहेर काढले जाते व ड्रमध्ये एका बाजूस साठविले जाते. तसेच बटाटा वेफर्समधील पाणी कमी करुन तेलामध्ये तळणेसाठी मशिनचा वापर होतो. मशिन सिंगल फेज घरगुती लाईटवरती चालते. ड्रायरमधील तयार पदार्थ पॅकिंगसाठी अत्यंत सोईस्कर.

द्रोण पत्रावळी (प्लेट) मशिन : आजच्या काळाची गरज. मशिनवरची पेपर प्लेट, थाली, द्रोण, पत्रावळी, प्रसाद कप, विविध नमुने वॉटरप्रुफ पेपरपासून बनविणेची सोय.
मशिन हाताने व इलेक्ट्रीक मोटरच्या सहाय्याने वापरण्याची सोय. मशिनच्या सहाय्याने १०,१२,१४, व १६ इंची गोल थाळी बनवीता येते. इलेक्ट्रीकवर अस्ल्याने डाय ताबडतोब गरम होतात व गरजेनुसार चालू-बंद करणेची सोयही आहे. मशिन हाड्रॉलिक व मेकॅनिकलमध्ये उपलब्ध.

Steel Sieve Making Machine

Potato Peeler Machine