शेतकरी

शेतकरी

यशस्वी शेतीसाठी नवा कानमंत्र

शेतकरी मित्रांनो, काळ झपाटयाने बदलतोय, सर्वत्र बदलाचे वारे वाहतायत. शेती सुद्धा त्याला अपवाद नाही. काळाची पाऊले ओळखून, नव्या विचारांचा, संकल्पनांचा अंगीकार करणे गरजेचे आहे. शेती करण्याच्या पद्धतींमध्ये आधुनिक व्यवस्थापन शैलीचा अंतर्भाव केल्यास शेतीविषयक कामांमध्ये उत्पादकता, पारदर्शकता आणि कार्यक्षमता वाढविणे सोपे ठरेल.

शेतकरी बांधवानो प्रथम आपले शेत हे एक कंपनी आहे.असे ठरवून घ्या. कंपनीला एक चांगले नाव देऊनउद्योग म्हणून त्यांची नोंद करा. कंपनीच्या नावे एक बँक खाते उघडा. कंपनीचा प्रकल्प अहवाल तयार करा. मग बँकेला प्रकल्प अहवाल दाखवून एक (कॅश क्रेडीट) अकाउंट ओपन करा.सर्व प्रथम आपण आपल्या कंपनीबद्दल सर्व जाणून घ्या. त्याची एक प्रोफाईल बनवा. थोडक्यात कंपनी प्रोफाईल बनवा. त्यामध्ये आपली जागा किती आहे, कोणत्या प्रकारची आहे. कृषी तज्ञांकडून आपल्या शेतातील मातीचा दर्जा तपासून घ्या. तसेच जमिनीचा दर्जा वाढवण्यासाठी काही उपाययोजना लागतील किंवा या जमिनीमध्ये व या वातावरणात कोणत्या प्रकारचे पिक येईल. याची सविस्तर माहिती लेखी स्वरुपात आपल्याकडे ठेऊन द्या. त्याचबरोबर एका वर्षाचे अंदाजपत्रक बांधून घ्या व त्याचे विघटन करा. उदा; पाउस कमी आला तर काय करावे. अतिवृष्टी झाल्यावर काय करावे. ओल्या किंव सुक्या दुष्काळावर कशी मात करता येईल, याचे नियोजन एक वर्ष आधी आपल्या कंपनी प्रोफाईलमध्ये तयार असावे.

अशा रीतीने नियोजनपूर्वक व आधुनिक व्यवस्थापन प्रणालीचा अवलंब केल्यास, सरकारी कार्यालय असो, बँक असो किंवा समाज, तुमची एक प्रगतीशील शेतकरी म्हणून प्रतिमा तयार होईल. तुमच्या शेतीला व्यावसायिक स्वरूप प्राप्त होईल, ज्यामुळे यशाच्या मार्गावरील तुमच्या वाटचालीला गती मिळेल.

Ecoflo-treadle-pump-21

Ecoflo-treadle-pump

Assembled-treadle-pump1

Kit